महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्वातंत्र्यलढ्यात भाजपा ब्रिटिशांच्या बाजूने होता, राहुल गांधींचा 'किसान की बात' कार्यक्रमात आरोप - राहुल गांधींची भाजपवर टीका न्यूज

कृषी कायद्याला काँग्रेसकडूनही विरोध केला जात आहे. या कायद्याबाबत 'किसान की बात' मध्ये बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी ने बिल का हा इंग्रजांचा कायदा असल्याचे सांगत त्याला विरोध केला आहे. 'भाजप करत असलेले कायदे शेतकऱ्यांच्या छातीत खंजिरासारखे घुसत आहेत. देश जेव्हा स्वातंत्र्यासाठी लढत होता, तेव्हा भाजप ब्रिटिशांच्या बाजूने उभा होता,' असेही राहुल यांनी म्हटले आहे. राहुल यांनी या कार्यक्रमादरम्यान काही शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राहुल गांधी लेटेस्ट न्यूज
राहुल गांधी लेटेस्ट न्यूज

By

Published : Sep 29, 2020, 3:48 PM IST

नवी दिल्ली -मागील काही दिवसांत कृषी विधेयक-2020 (Farm Bill 2020) राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर अनेकांनी टीका केली होती. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते, तेव्हाच अनेक ठिकाणच्या शेतकरी आणि राजकीय संघटनांनी याला विरोध केला होता. आता या विधेयकाला काँग्रेसकडूनही विरोध केला जात आहे. या कायद्याबाबत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी ने बिल का हा इंग्रजांचा कायदा असल्याचे सांगत त्याला विरोध केला आहे. या कायद्याविरोधात त्यांनी त्यांच्या 'किसान की बात' मध्ये जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली आहे.

'भाजप शेतकरी विरोधी कायदे करत आहे. आताच्या या नव्या कायद्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे,' असे राहुल यांनी त्यांच्या 'किसान की बात' मध्ये म्हटले आहे. याचा व्हिडिओ त्यांनी नुकताच शेअर केला आहे. या कायद्यांमुळे केवळ खासगी कंपन्यांचा फायदा होईल आणि शेतकरी असहाय्यपणे पहात राहील,' असे ते म्हणाले.

हेही वाचा -कर्तव्यासह आपली आवडही तेवढ्याच जोमाने जपणारा 'खाकी वर्दीतील शिल्पकार'

'भाजप करत असलेले कायदे शेतकऱ्यांच्या छातीत खंजिरासारखे घुसत आहेत. देश जेव्हा स्वातंत्र्यासाठी लढत होता, तेव्हा भाजप ब्रिटिशांच्या बाजूने उभा होता,' असेही राहुल यांनी म्हटले आहे. राहुल यांनी या कार्यक्रमादरम्यान काही शेतकऱ्यांशी संवाद साधला.

"नोटाबंदी, जीएसटी आणि शेतकऱ्यांसाठीच्या कायद्यांमध्ये फरक काहीच नाही. फरक एवढाच आहे की, आधीच्या कायद्यांनी शेतकऱ्यांच्या पायांवर कुऱ्हाड मारली होती. तर आताच्या कायद्याने त्यांच्या छातीत खंजीर खुपसला आहे. या लोकांना शेतकऱ्यांच्या व्यथा समजणार नाहीत. ते स्वातंत्र्यलढ्यावेळी ब्रिटिशांच्या बाजूने उभे होते,' असे राहुल म्हणाले. 'महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात अनेक चळवळी सुरू केल्या. जर आज ते जिवंत असते तर, त्यांनी या कायद्यांचा नक्कीच विरोध केला असता,' असे ते पुढे म्हणाले.

दरम्यान, संसदेत कृषी विधेयक मंजूर झाल्यापासून शेतकरी संघटना आणि काही राजकीय संघटनांकडून याला विरोध होत आहे. यापैकी काही जणांनी या कायद्यांविरोधात राष्ट्रव्यापी निदर्शनेही केली आहेत. तर, याच कारणाने शिरोमणी अकाली दलही एनडीएतून बाहेर पडला आहे.

हेही वाचा -प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार साकारणार 'अटल' मूर्ती; शिमल्यात होणार प्रतिष्ठापना

ABOUT THE AUTHOR

...view details