नवी दिल्ली - महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्यमय घडामोडींनी वेगळे वळण घेतले असून भाजपने आज सकाळी सत्ता स्थापन केली. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. 'भाजपने लोकशाहीला ठार मारण्याची सुपारी घेतली असून राज्यपाल हे पुन्हा एकदा शाह यांचे हिटमॅन असल्याचे स्पष्ट झालयं', असे सुरजेवाला यांनी टि्वट करून म्हटले आहे.
राज्यातील राष्ट्रपती शासन कधी हटवण्यात आले?, सत्ता स्थापनेचा दावा कधी करण्यात आला?, आमदारांची यादी राज्यपालांना कधी देण्यात आली?, आमदार राज्यपालांसमोर कधी हजर झाले?, चोरांसारखी का शपथ घेतली?, असे प्रश्न सुरजेवाला यांनी टि्वटमधून उपस्थित केले आहेत.