नवी दिल्ली -सध्या जम्मू काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे. काश्मीरला पुन्हा कलम 370 चा दर्जा परत मिळावा, यासाठी राज्यातील सर्व पक्षांनी मिळून 'पीपल्स फॉर गुपकर डिक्लेरेशन' या पक्षांची स्थापन केली आहे. यावरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. पीपल्स फॉर गुपकर डिक्लेरेशनच्या माध्यमातून काँग्रेस एक कट रचत आहे. काँग्रेसला यावर उत्तर द्यावे लागेल, असे ते म्हणाले.
चीनच्या मदतीने कलम 370 परत लागू करु असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला म्हणातात. तर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त होत नाही. तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही, असे जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. तर चिंदबरम यांनी कलम 370 रद्द करणे चुकीचे आहे, असे टि्वट केले होते. या सर्व गोष्टी पाहिल्यास लक्षात येईल की, हे सर्व एकमेंकाशी कनेक्ट आहेत, असे पात्रा म्हणाले.