महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार प्रकरण: 'त्या' मुलीच्या प्रश्नावर प्रियंका गांधी म्हणाल्या... भाजप जवाब दो ! - मुनीबा किदवई

देशभर गाजलेल्या उत्तर प्रदेशमधील उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी बाराबांकी येथील एका मुलीने विचारलेल्या प्रश्नावर प्रियंका गांधी यांनी टि्वट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

प्रियंका गांधी

By

Published : Aug 1, 2019, 7:35 PM IST

नवी दिल्ली - देशभर गाजलेल्या उत्तर प्रदेशमधील उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी बाराबांकी येथील एका मुलीने विचारलेल्या प्रश्नावर प्रियंका गांधी यांनी टि्वट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.


'जर एखादी मोठी व्यक्ती गुन्हा करते. तेव्हा त्याच्याविरुद्धचा आमचा आवाज ऐकला जाईल का? बाराबांकीच्या मुलीने विचारलेला हा प्रश्न उत्तर प्रदेशमधील प्रत्येक महिला आणि मुलीच्या मनात आहे. या प्रश्नाचे भाजपने उत्तर द्यावे असे टि्वट प्रियंका गांधी यांनी केले आहे.


बाराबांकीच्या आनंद भवन शाळेमध्ये ‘बालिका जागरुकता कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी छेडछाडीच्या तक्रारींसाठी एक हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केला. यावर मुनीबा किदवई या मुलीने 'जर आम्ही न घाबरता या नंबरवर संपर्क साधला तर आम्हाला न्याय मिळेल का? आवाज उठवल्यानंतर आम्ही सुरक्षीत राहू याची खात्री आहे का? असे अनेक प्रश्न विचारले. यावर 'जर तुम्ही आवाज उठवला तर इतर मुली जागरूक होतील आणि त्याही त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूध्द आवाज उठवतील', असे उत्तर पोलीस अधिकाऱ्याने दिले.


काय आहे प्रकरण?


देशभर गाजलेल्या उन्नाव सामूहिक बलात्कार घटनेतील पीडिता आणि तिचे कुटुंब रायबरेली येथील कारागृहात बंद असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होते. त्यावेली त्यांच्या कारला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात पीडितेची काकू आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. यापैकी पीडितेची काकू ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. तर, वकिलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी कुलदीप सेंगर सध्या तुरुंगात असून तो तेथूनच आपल्या आणि आपल्या मुलीभोवती हे संपूर्ण कारस्थान रचत असल्याचे पीडितेच्या आईने म्हटले आहे. अपघाताप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर, त्याचा भाऊ मनोज सिंह सेंगर आणि इतर ८ जणांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details