नवी दिल्ली -बँकिंग क्षेत्रातील फसवणूक प्रकरणी सभागृहात गदारोळ निर्माण झाला. बँकांना फसवणाऱ्या ५० लोकांच्या नावांची घोषणा करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. 'बँकांची फसवणूक करणाऱ्या डिफॉल्टर्सची यादी वेबसाईटवर उपलब्ध असून त्यामध्ये लपवण्यासारखे काही नाही. काँग्रेस सरकारच्या काळातच पैसे घेऊन फरार झालेल्याकडून भाजप पैसे वसूल करण्याचे काम करत आहे', असे अनुराग ठाकूर म्हणाले.
'काँग्रेस सरकारच्या काळातच लोक पैसे घेऊन फरार झाले' - राहुल गांधी के सवाल
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. 'बँकांची फसवणूक करणाऱ्या डिफॉल्टर्सची यादी वेबसाईटवर उपलब्ध असून त्यामध्ये लपवण्यासारखे काही नाही. काँग्रेस सरकारच्या काळातच पैसे घेऊन फरार झालेल्याकडून भाजप पैसे वसूल करण्याचे काम करत आहे', असे अनुराग ठाकूर म्हणाले.
लोकांचा देशातील बँक व्यव्यस्थेवर पूर्ण विश्वास आहे. देशातील प्रत्येक बँक पूर्णपणे सुरक्षीत असून येस बँकेतील खातेधारकही सुरक्षीत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. भारत सरकारने आतापर्यंत 4 लाख 80 हजार कोटींचे कर्जवसूली केली आहे. त्यामुळे भारतीय बँकावर प्रश्न उपस्थित करणे हे त्यांचे अज्ञान दाखवते, असा अप्रत्यक्ष टोला राहुल गांधींना त्यांनी लगावला.
मी फक्त बँकांना फसवणाऱ्या ५० लोकांच्या नावांची घोषणा करण्याची मागणी केली होती. मात्र, मला स्पष्ट उत्तर देण्यात आले नाही. तसेच अध्यक्षांनी मला पुन्हा प्रश्न विचारण्यासाठी परवानगीही दिली नाही. या गोष्टीचं दुःख वाटल. एक खासदार म्हणून प्रश्न विचारणे माझा अधिकार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.