नवी दिल्ली - आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दिल्लीमधील एकूण ७० जागांपैकी ५७ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपच्या दिल्ली विभागाचे प्रमुख मनोज तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ५७ उमेदवारांपैकी ११ हे एससी प्रवर्गातील आहेत, तर चार महिला आहेत.
या यादीमध्ये आपचे माजी आमदार कपिल मिश्रा यांचाही समावेश आहे. मात्र, दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कोण उभे राहणार आहे याचा उल्लेख या यादीमध्ये केला गेलेला नाही. केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती तिवारी यांनी दिली. रोहिणी मतदारसंघाचे आमदार गुप्ता हे पुन्हा तिथूनच निवडणूक लढवणार आहेत. तर, मिश्रा हे मॉडेल टाऊन मतदारसंघातून निवडणूक लढवतील.