- सर्वच शेतकऱ्यांना शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत ६००० रुपये प्रति वर्ष देणार
- राम मंदिर निर्माणावर लवकरच निर्णय घेणार
- भाजपच्या 'संकल्प पत्रात' ७५ संकल्प; देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाला समर्पित.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांना ३ दिवस शिल्लक आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप आज निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करू शकते. काँग्रेसच्या 'न्याय' योजनेच्या विरोधात राष्ट्रवाद, शेतकरी कल्याण आणि महिला सशक्तीकरण या मुद्द्यावर भर देण्याची शक्यता आहे. तर, वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देण्याची हमीही या घोषणापत्रात असण्याची शक्यता आहे.
भाजपच्या संकल्प पत्र समितीच्या सदस्यांनी जाहीरनाम्याचा मसूदा पूर्ण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही बदल न सूचवल्यास आज हा जाहीरनामा प्रसिद्ध होऊ शकतो. यापूर्वीही मोदींनी यामध्ये काही बदल सूचवले होते. मात्र, यावर शेवटचा निर्णय हा पक्षाध्यक्ष अमित शहांचाच असणार आहे.
हा जाहीरनामा शेतकरी, तरुण, महिला आणि राष्ट्रवादावर केंद्रीत आहे. कॅबिनेटमध्ये महिलांना १५ टक्के आणि विविध आयोगांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यात येईल. काँग्रेसच्या 'न्याय' योजनेला टक्कर देण्यासाठी शेतकरी मासिक पेन्शन योजना किंवा कृषक भविष्य निधी योजना सुरू करण्याची हमी भाजप देऊ शकते. उद्योग आणि व्यापार सुरू करण्यासाठी महिला आणि युवकांना विशेष सूट देण्याचाही भाजप प्रयत्न करेल.
हे मुद्दे घोषणापत्रात असण्याची शक्यता -
राष्ट्रीय सुरक्षेचा मुख्यत्वे उल्लेख
शेतकऱ्यांसाठी मासिक पेन्शन योजना
रोजगार आणि स्वयंरोजगाराची हमी
सवर्णांच्या १० टक्के आरक्षणावर सविस्तर चर्चा
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा विस्तार करण्याची शक्यता
मंत्रिपरिषदेत महिलांना १५ टक्के आरक्षण देण्याची हमी