महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भोजपुरी अभिनेते रवी किशन यांना भाजपची उमेदवारी; तर 'जूता कांड'मधील नेत्याला बाहेरचा रस्ता

'जिंदगी झंड बा फिर भी घमंड बा' भोजपुरी सिनेमातील हा प्रसिद्ध डायलॉग आताही लोकांच्या तोंडून ऐकू येतो. हे डायलॉग म्हणणारे रवी किशन आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

रवी किशन आणि शरद शर्मा

By

Published : Apr 15, 2019, 7:27 PM IST

लखनौ -लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने ७ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये बॉलिवूड आणि भोजपुरी अभिनेते रवी किशन यांना भाजपने उमेदवारी दिली. ते योगी आदित्यनाथ यांचा गड असलेल्या गोरखपूर येथून निवडणूक लढणार आहेत. तर, सपा-बसपच्या आघाडीतून बाहेर पडलेले प्रविण निषाद यांना संत कबीर नगरातून तिकीट देण्यात आली आहे.

'जिंदगी झंड बा फिर भी घमंड बा' भोजपुरी सिनेमातील हा प्रसिद्ध डायलॉग आताही लोकांच्या तोंडून ऐकू येतो. हे डायलॉग म्हणणारे रवी किशन आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी मागच्याच वेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, ते निवडणूक लढवणार का यावर प्रश्न चिन्ह होते. त्यानंतर शेवटी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गडातून ते निवडणूक लढणार आहेत.


महत्वाचे म्हणजे निवडणुकीचे सत्र सुरू होण्याआधी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बसपसोबत निषाद पक्षाने आघाडी केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी निषाद पक्ष बाहेर पडला. त्या पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांचे पुत्र प्रवीण निषाद यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.


निषाद यांना संत कबीर नगर येथून उमेदवारी जाहीर झाली आहे. यापूर्वी या मतदार संघातून शरद त्रिपाठी यांनी निवडणूक जिंकली होती. मात्र, काही महिन्यापूर्वी त्यांचे प्रसिद्ध जूता कांडमध्ये नाव समोर आले होते. त्यांनी राकेश बघेल यांना जूत्यांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाचा व्हिडिओही समोर आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details