महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गांधी जयंतीनिमित्त भाजपच्या'गांधी संकल्प यात्रे'ला सुरवात, प्लास्टिक बंदीचा दिला नारा - Prime Minister Narendra Modi

महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज (२ ऑक्टोबर) भारतीय जनता पक्ष देशभरात कार्यक्रम घेत आहे

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह

By

Published : Oct 2, 2019, 1:24 PM IST

नवी दिल्ली -महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज (२ ऑक्टोबर) भारतीय जनता पक्ष देशभरात कार्यक्रम घेत आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज दिल्लीमध्ये 'गांधी संकल्प यात्रे'ला सुरवात केली. 'गांधींची १५० वी जयंती आपल्या सर्वासाठी संकल्पाची बनावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्लास्टिकपासून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. प्लास्टिकचा वापर न करून मोदींचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबादारी आपल्या सर्वांची आहे', असे अमित शाह जनतेला संबोधित करताना म्हणाले.


महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसाचा मार्ग जगाला दाखवला. भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून दिली. सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांना झुकायला भाग पाडले. अशा या महामानवाची जयंती संपुर्ण देश साजरी करत आहे, असे शाह म्हणाले.


भाजपचे कार्यकर्ते आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत १५० किलोमीटर पदयात्रा करणार आहेत. कार्यकर्ते या पदयात्रेच्या माध्यमातून गांधीचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याची माहिती शाह यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details