जाधवपूर - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या जाधवपूरमधील रॅलीला परवानगी नाकराण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या रॅलीसाठी येणाऱया अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यासही परवानगी नाकरण्यात आली आहे.
भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या जाधवपूरमधील रॅलीला परवानगी नाकारली - रॅली
पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील राजकारणाने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात आता भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीला राज्य सराकारने परवानगी नाकारल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
भाजपाध्यक्ष अमित शाह
अमित शाह यांच्या रॅलीचे जाधवपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने त्यांच्या रॅलीला परवानगी नाकरण्यात आल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अमित शाह यांच्या रॅलीला परवानगी नाकारल्याने राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारमधील राजकारण चांगलेच तापले आहे.