नवी दिल्ली -काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. देशामध्ये होणारे दहशतवादी हल्ले पाकिस्तान प्रणीत असतात की नाही. हे काँग्रेसने स्पष्ट करावे. त्यानंतर पित्रोदा यांनी सांगावे की पाकिस्तान यात दोषी आहे किंवा नाही, असे प्रश्न अमित शाह यांनी दागले आहेत. त्यांच्या प्रश्नानंतर राजकारण तापण्याची शक्यता तयार झाली आहे.
दहशतवादी हल्ले पाकिस्तान प्रणीत असतात की नाही काँग्रेसने स्पष्ट करावे - अमित शाह - Pulwama Attack
शुक्रवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि घोषणा पत्र समितीचे सदस्य सॅम पित्रोदा यांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आज भाजपने विशेष पत्रकार परिषद घेऊन यावर उलट काँग्रेसलाच प्रश्न विचारले आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना अमित शाह
शुक्रवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि घोषणा पत्र समितीचे सदस्य सॅम पित्रोदा यांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आज भाजपने विशेष पत्रकार परिषद घेऊन यावर उलट काँग्रेसलाच प्रश्न विचारले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.