नवी दिल्ली - पैशाचा मोठा वापर करून भाजपने राबवलेल्या आक्रमक प्रचार मोहिमेमुळे आम आदमी पार्टीच्या दिल्ली निवडणूक जिंकण्याच्या क्षमतांबद्दल काही शंका व्यक्त केल्या जात होत्या. पण अरविंद केजरीवाल यांनी केवळ स्वयंशंकाचाच नव्हे तर भाजप नेत्यांनी त्यांच्याकडे फेकलेल्या प्रत्येक आव्हानाचा पराभव केला. आपने ६३ जागा जिंकल्या आहेत आणि आता तो पुढील ५ वर्ष दिल्लीवर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. आप पुन्हा मोफत प्रशासनाच्या कारभाराचा आनंद लुटायला आप तयार आहे, जे इतर राज्यांच्या हेव्याचा विषय बनले आहे. तसेच मोफत वीज आणि पाणी हे मॉडेल आपल्याकडेही राबवण्यास अनेक राज्ये उत्सुक आहेत.
भाजपने ही निवडणूक सीएए आणि एनआरसीसाठी सार्वमत म्हणून रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला होता. पण आपने नकळत आणि हेतू नसतानाही, आपल्या विजयातून, दिल्लीच्या लोकांना वाटणारे चिंतेचे मुद्दे वेगळे आहेत, हे सिद्ध केले. भारताला तथाकथित बाहेरच्या लोकांपासून धोका आहे आणि राष्ट्रीय नागरिक नोंदपुस्तिकेच्या माध्यमातून अशा लोकांना निपटून काढण्याची सरकारची इच्छा आहे, या भाजपच्या प्रचारावर त्यांचा विश्वास बसला नाही.
शाहिन बाग निदर्शने, जेथे महिला गेल्या ६० दिवसांपासून धरणे धरून बसल्या आहेत, ही राष्ट्रविरोधी आणि देशाला हानिकारक ठरणार्या शक्तींच्या पाठिंब्यावर आहेत, असे सुचवून भाजपने निवडणुकीत ध्रुविकरण करण्याचा प्रयत्न केला. ना हे ध्रुविकरण कामाला आले ना केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्यासारख्या नेत्यांची द्वेषपूर्ण भाषणे कामाला आली.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री महंत आदित्यनाथ यांनी मुस्लिमांच्या बिर्याणीबाबत मळमळ ओकून मुस्लिमांबाबत नेहमीच्याच भावना भडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचे जे ऐकणार नाहीत, त्यांना गोळ्या घालण्याचा आदेश देताना त्यांना जो आनंद होत होता, त्यामुळे आदित्यनाथ यांनी नवी खालची पातळी गाठली. दिल्लीचे लोक राजकारणात काही विशिष्ट सभ्यता पाळत असतात आणि ते आदित्यनाथ यांच्या उद्गारांनी भयभीत झाले. पण निवडणूक आयोग झोपेत असल्याने जामिया आणि शाहिन बाग येथील आंदोलकांना गोळ्या घालण्याचे प्रोत्साहन काही समर्थकांना मिळाले. दिल्लीच्या लोकांना निदर्शनांमुळे होणारी गैरसोय आपल्या भूमिकेला आकार देण्यासाठी मदत करेल, असा विचार भाजपने केला होता. पण ते किती चुकीच्या मार्गाने सिद्ध झाले. त्याऐवजी आपच्या जागांची संख्या ६३ वर गेली. केजरीवाल केवळ ६ वर्षांच्या प्रस्थापितविरोधी लाटेशी लढत नव्हते तर, भाजपने सुरू केलेल्या आक्रमक राष्ट्रवादाच्या प्रचाराविरोधातही लढत होते. हे पाहिले तर आपचा विजय किती शानदार आहे, हे लक्षात येते. काँग्रेस निवडणुकीतील नव्या खालच्या पातळीवर कोसळली आहे. ६७ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने अनामत रक्कम गमावली आणि अनेकांना असे वाटते की, आप आणि काँग्रेस यांच्यात गुप्त समझोता झाला होता. वरिष्ठ काँग्रेस खासदार केटीएस तुलसी यांनी अशा समझोत्याचा स्पष्टपणे दावा केला. काँग्रेसचे नेत्या प्रियंका गांधी किंवा राहुल गांधी मतदानाच्या दिवसाच्या ७२ तास अगोदर प्रचारासाठी बाहेरही पडले नाहीत, यावरून या तर्काला बळकटी मिळते.
अनेक भाष्यकारांच्या नेतृत्वाखाली असा चोरटा प्रचार करण्यात येत होता की, काँग्रेसला या निवडणुकीत काही महत्व नाही आणि पक्षाने भाजपविरोधात प्रतिकार उभा करणे चांगले ठरेल. सर्वात जुन्या पक्षाने या निवडणुकीतून बाहेरच रहावे, या प्रचाराला दोन्ही नेत्यांना मान डोलवली. मात्र काँग्रेसकडे विकासकामांबाबत दाखवण्यासारखे भाजप आणि आपपेक्षा जास्त होते,याकडे दुर्लक्ष केले गेले. काँग्रेस २०१९ च्या संसदीय निवडणुकीत दुसर्या स्थानावर राहिली होती. काँग्रेस नेतृत्वापुढे दुसरा युक्तिवाद असा केला होता की, दिल्लीची निवडणूक ही एखाद्या नगरपालिकेच्या निवडणुकीसारखी आहे आणि काँग्रेसने तिच्यापासून दूर रहावे. आप हा वैचारिक दृष्ट्या अज्ञेयवादी पक्ष असल्याने,त्याला जिंकण्याची जास्त संधी आहे. काँग्रेसने या निवडणुका आक्रमकपणे लढवल्या असत्या तर भाजप मोठा पक्ष म्हणून समोर आला असता. भाजपने ज्या काही थोड्या जागा जिंकल्या त्या काँग्रेसने आपची मते खाल्ल्याने जिंकल्या. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, ही अत्यंत महत्वाची निवडणूक जिंकण्यासाठी मदत केल्याबपद्दल आपने काँग्रेसप्रती ऋणी असले पाहिजे.
गमतीची गोष्ट अशी की, दिल्ली निवडणुका अशा वेळी झाल्या जेव्हा संसदेत सीएए मंजूर झाल्याने राजधानीमध्ये जनक्षोभाचे वातावरण होते. १५ डिसेंबरला, दिल्ली पोलिसांनी जामिया मिलिया विद्यापीठ परिसरात सीएएविरोधी निदर्शने मोडून काढण्यासाठी प्रवेश केला आणि निर्दयीपणे विद्यार्थ्यांना झोडपून काढले. विद्यार्थिनीही त्यातून सुटल्या नाहीत. विद्यार्थी आंदोलनांना राज्य सरकारचा हिंसक प्रतिसाद हा सुन्न करणारा होता. याच सुमारास, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि परिसरात तसेच उत्तरप्रदेशातील अन्य शहरांमध्ये विद्यार्थी आंदोलने अत्यंत निर्घृणपणे चिरडण्यात आली. जामिया घटनेनंतर जवळच्या शाहिन बाग परिसरातील महिलांनी जवळच्या बागेत धरणे धरण्याचे ठरवले, जे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्याचे परिणाम खूप मोठे आणि लाक्षणिकवादात झाले आहेत. या महिलांनी भारतीय घटनेची शपथ घेतली आणि नियमितपणे त्या घटनेची समावेशक प्रस्तावना वाचत असतात. शाहिनबागचा नमुना सर्व देशभर फैलावला आहे आणि विद्यार्थी त्या आंदोलनाचे बिनीचे सैनिक बनले आहेत. एका वृत्तवाहिनीन घेतलेल्या पाहणीत २० टक्के तरूण भाजपपासून दूर गेल्याचे वास्तवात स्पष्ट झाले आहे. तरूणांनी घेतलेली ही फारकत भाजपला तसेच त्याच्या अपवादात्मक आणि हिसंक प्रचाराला दुखावत आहे. दिल्लीत असे प्रसंग घडत होते की, तरूण आपल्या घरातील ज्येष्ठ लोकांनी भाजपला मत देऊ नये, यासाठी भांडत असत. काही विचित्र घटना अशाही आहेत की, तरूणांनी आपले ज्येष्ठ भाजपला मते देतील म्हणून त्यांना घरात कोंडून कुलूप घातले आहे.
दिल्ली निवडणुकीने राजधानीतील खोलवर फूट पडल्याचे सुचवत आहे. अल्पसंख्याकच फक्त भाजपला विरोध करत आहेत असे नव्हे तर, ज्या तरूणांना धर्मनिरपेक्ष शिक्षण मिळाले आहे आणि धार्मिक फॅसिझम देशात वाढला तर ते काय गमावू शकतात, हे ओळखणारे तरूणही विरोध करत आहेत. हेच कारण आहे की देशातील प्रत्येक विद्यापीठ परिसर क्षोभग्रस्त आहे. भाजप नेतृत्वाने राष्ट्रीय सुरक्षा आणि आक्रमक धार्मिक ध्रुविकरण त्यांना राज्यातील निवडणुकांमध्ये मदत करते की नाही, याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.
हेही वाचा :'हाऊडी मोदी' नंतर आता होणार 'केम छो ट्रम्प'...