महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कैलाश विजयवर्गीय यांनी केली 'कलम 30' हटवण्याची मागणी

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी टि्वट करून 'कलम 30' हटविण्याची मागणी केली आहे. 'आपला देश धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने आहे. तेव्हा 'कलम 30' ची काय गरज आहे', असे त्यांनी म्हटलं आहे.

कैलाश विजयवर्गीय
कैलाश विजयवर्गीय

By

Published : May 29, 2020, 1:00 PM IST

नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी 'कलम 30' बाबत मोठे विधान केले आहे. विजयवर्गीय यांनी टि्वट करून 'कलम 30' हटविण्याची मागणी केली आहे. 'आपला देश धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने आहे. तेव्हा 'कलम 30' ची काय गरज आहे', असे त्यांनी म्हटलं आहे.

'30 व्या कलमामुळे देशातील घटनात्मक समानतेचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हे अल्पसंख्याकांना धार्मिक प्रचार आणि धार्मिक शिक्षण करण्यास अनुमती देते, जे इतर धर्मांना मिळत नाही. आपला देश धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने आहे. तेव्हा 'कलम 30' ची काय गरज आहे. हे कलम हटवण्यात यायला हवे', असे टि्वट विजयवर्गीय यांनी केले आहे.

कैलास विजयवर्गीय हे आपल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चर्चेत असतात. यापूर्वी त्यांचा इंदौरमध्ये एका प्रशासकीय अधिकाऱ्याला धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच त्यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत आमदार आकाश विजयवर्गीय यांनी केलेल्या मारहाणीसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. कोणाचाही मुलगा असो, शिस्तभंग चालणार नाही, असे मोदींनी आकाश यांचे नाव न घेता म्हटले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details