चंदीगड - पंजाबच्या गुरुदासपूर येथून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकलेले अभिनेता-राजकारणी सनी देओल यांची खासदारकी धोक्यात आली आहे. प्रचारादरम्यान मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे.
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी ७० लाख रुपये इतकीच रक्कम खर्च करण्याची मर्यादा आहे. मात्र, सनी यांनी ८६ लाख रुपये खर्च केले होते, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल झाली होती. मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे निवडणूक आयोगाच्या पडताळणीत आढळून आल्यास, अशा खासदारांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. अशा स्थितीत निवडणूक आयोग संबंधित व्यक्तीची खासदारकी रद्द करून त्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करु शकतो.