लखनौ - उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथे सुरू असलेल्या एका बैठकीत भाजप खासदार शरद त्रिपाठी आणि भाजप आमदार राकेश सिंह बघेल यांच्यात हाणामारी झाली. शाब्दिक वादानंतर त्रिपाठी यांनी पायातील बूट काढून बघेल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर बघेल त्रिपाठी यांच्या अंगावर धावत गेले.
भाजप खासदार-आमदारामध्ये बैठकीतच हाणामारी; उत्तर प्रदेशातील प्रकार - blows
विकासकामांच्या उद्घाटनाबाबत नावांची चर्चा करताना दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या बैठकीला भाजपचे अनेक मंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
भाजप खासदार-आमदारामध्ये बैठकीतच हाणामारी
विकासविषयक कामांविषयी चर्चा करण्यासाठी पक्षाची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. विकासकामांच्या उद्घाटनाबाबत नावांची चर्चा करताना दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या बैठकीला भाजपचे अनेक मंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, खासदार त्रिपाठी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आमदार बघेल आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.