महाराष्ट्र

maharashtra

तबलिगींची माहिती द्या.. ११ हजार रुपये मिळवा..

By

Published : Apr 26, 2020, 9:37 AM IST

उत्तर प्रदेशमधील भाजपचे सालेमपूर मतदार संघातील खासदार रवींद्र कुशवाह यांनी तबलिगींची माहिती देणाऱ्यास ११ हजार रुपये इनाम जाहीर केला आहे.

BJP MP Ravindra Kushwaha
BJP MP Ravindra Kushwaha

नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशामध्येही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. यावर उत्तर प्रदेशमधील भाजपचे सालेमपूर मतदारसंघातील खासदार रवींद्र कुशवाह यांनी तबलिगींची माहिती देणाऱ्यास ११ हजार रुपये बक्षीस जाहीर केला आहे.

सभांव्य रुग्ण आणि तबलिगी जमातीचे मरकझमध्ये सहभागी असलेल्या लोकांवषियी माहिती देणाऱ्यांस 11 हजार रुपये इनाम देण्यात येईल. रुग्णांचा अहवाल पॉझिटव्ह आल्यानंतर रक्कम देण्यात येईल. परदेशी प्रवासाचा इतिहास असलेले लोक आणि तबलिगी जमातीचे मरकजच्या मेळाव्यातील उपस्थिती असलेले लपून बसली असून कोरोना चाचणी टाळत आहेत. संबधित लोकांची माहिती देणाऱ्यांचे नावही गुप्त ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details