नवी दिल्ली -भाजप खासदार नलीन कतील यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तुलना नथुराम गोडसे व अजमल कसाब यांच्याशी केली आहे. राजीव गांधींनी १७ हजार लोकांना मारले. नथूराम गोडसे यांनी एकाला तर कसाबने ७२ जणांना मारले आता तुम्हीच ठरवा अधिक क्रूर कोण? असे ट्विट भाजप खासदार नलीन कुमार कतील यांनी केले.
'गोडसेने एकाला तर राजीव गांधींनी १७ हजार लोकांना मारले, भाजप नेत्याचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य - mp
भाजप खासदार नलीन कतील यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तुलना नथुराम गोडसे व अजमल कसाब यांच्याशी केली आहे. राजीव गांधींनी १७ हजार लोकांना मारले. नथूराम गोडसे यांनी एकाला तर कसाबने ७२ जणांना मारले आता तुम्हीच ठरवा अधिक क्रूर कोण? असे ट्विट भाजप खासदार नलीन कुमार कतील यांनी केले.
नलीन कुमार कतील यांच्या ट्विटमुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. यामुळे त्यांनी ट्विट डिलीट केले आहे. माझ्या ट्विटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो, असे नलीन कुमार यांनी म्हटले आहे.
प्रज्ञासिंह ठाकूर, अनंतकुमार हेगडे, मध्य प्रदेशातील भाजप नेते अनिल सौमित्र यांच्यानंतर आता भाजप खासदार नलीन कतील यांनी महात्मा गांधी, नथुराम गोडसे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे कमल हासन यांच्या गोडसे यांच्या वक्तव्यानंतर सुरु झालेला वाद थांबताना दिसत नाही.