नवी दिल्ली - भाजपचे खासदार गौतम गंभीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी क्रिकेटचे मैदान गाजवले आहे. नुकताच गंभीर यांनी इम्रान यांच्या संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या भाषणावरून त्यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यांनी '15 मिनिटांत माणसाची वृत्ती समजली' असे म्हटले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा इम्रान यांच्यावर सडकून टीका करताना इम्रान खान दहशतवाद्यांचे 'रोल मॉडेल' आहेत, असे म्हटले आहे.
इम्रान खान दहशतवाद्यांचे 'रोल मॉडेल,' गौतम गंभीर यांचा हल्लाबोल
'खेळाडूंना आदर्श असल्याचे मानले जाते. मात्र, पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या इम्रान खान यांनी दहशतवाद्यांचे 'रोल मॉडेल' असल्याप्रमाणे स्वतःला सर्वांसमोर प्रस्तुत केले. त्यांना क्रीडापटूंच्या समुदायातून बहिष्कृत केले पाहिजे,' असे ट्विट गंभीर यांनी केले आहे.
'खेळाडूंना आदर्श असल्याचे मानले जाते. चांगली वागणूक, संघभावना, नीतीमूल्ये, चांगले चारित्र्य यासाठी खेळाडूंकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. नुकतेच एका माजी खेळाडूने संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषण केले, हेही आम्ही सर्वांनी पाहिले. मात्र, या खेळाडूने दहशतवाद्यांचे 'रोल मॉडेल' असल्याप्रमाणे स्वतःला सर्वांसमोर प्रस्तुत केले. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या इम्रान खान यांना क्रीडापटूंच्या समुदायातून बहिष्कृत केले पाहिजे,' असे ट्विट गंभीर यांनी केले आहे.
इम्रान खान पाकिस्तानचे कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने पहिल्यांदा १९९२ साली वर्ल्डकप जिंकला. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काश्मीरमधून निर्बंध हटवल्यानंतर तिथे मोठा हिंसाचार होईल असे वक्तव्य इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बोलताना केला. त्यांनी अण्वस्त्र वापरण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल असा इशाराही दिला. त्यांची ही भाषा युद्धखोरीची असल्याची जोरदार टीका होत आहे. आता गंभीर यांनी इम्रान दहशतवाद्यांसमोर आदर्श ठेवावा, अशा प्रकारचे बोलत असल्याची टीका केली आहे.