महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'लॉकडाऊन नियमांची एैशीतैशी'; भाजप आमदाराच्या मुलाची महामार्गावर घोडेस्वारी - karnataka latest news

निरंजन कुमार यांनी आपल्या मुलाचे समर्थन केले असून रस्त्यावर घोडेस्वारी करू नये, असा कोणताही नियम नसल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही ग्रीन झोनमध्ये राहतो.

घोडेस्वारी
घोडेस्वारी

By

Published : May 13, 2020, 11:34 PM IST

बंगळुरू -कर्नाटकमधील भाजप आमदाराच्या मुलाचा राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजप आमदार निरंजन कुमार यांच्या मुलाने लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

म्हैसूर-ऊटी राष्ट्रीय महामार्गावर निरंजन कुमार यांच्या मुलाने घोडेस्वारी केली. शहरातील आयटीआय कॉलेजजवळ ही घटना घडली. यावेळी त्याने मास्कही घातले नव्हते. निरंजन कुमार यांनी आपल्या मुलाचे समर्थन केले असून रस्त्यावर घोडेस्वारी करू नये, असा कोणताही नियम नसल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही ग्रीन झोनमध्ये राहतो, त्यामुळे सगळेच मास्क घालत नाहीत. मात्र, मी काळजी म्हणून सर्वांना मास्क घालायला सांगेन आणि त्यांच्याकडून काही चुकले असेल, तर समजून सांगेल, असेही ते म्हणाले.

कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण आणण्यासाठी लोकांनी जिथे आहे तिथेच राहणे आणि जनसंपर्क टाळणे आवश्यक आहे. या परिस्थितीत घराबाहेर फिरणे धोकदायक आहे. यामुळे अनेक लोकांमध्ये हा संसर्ग फैलावण्याची शक्यता वाढते. मात्र, लोक अद्यापही लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसून बाहेर फिरण्यास प्राधान्य देत आहेत. सुशिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत सर्वच लोक 'लॉकडाऊन'चा उद्देश लक्षात घेत नसल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details