नवी दिल्ली - भारतात बुरख्यावरील बंदीच्या मागणीवरून राजकारण पेटले आहे. उत्तर प्रदेशातील भाजप आमदार संगीत सोम यांनी यावरून वादग्रस्त विधान केले आहे. 'भारतीय महिलांच्या डोक्यावरील पदराआडून दहशतवाद परसत नाहीये. बुरख्या आडून तो पसरतोय म्हणून बुरख्यावर बंदी हवी,' असे त्यांनी म्हटले आहे.
'महिलांच्या पदराआडून नव्हे, बुरख्याआडून पसरतोय दहशतवाद,' भाजप नेत्याचे वक्तव्य - bjp
श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातल्यानंतर शिवसेनेने भारताही बुरखाबंदी व्हावी, अशी मागणी केली होती. नंतर त्यांनी अनेकांच्या विरोधानंतर यावर घूमजाव केले होते. मात्र, ही मागणी काही नेते उचलून धरत आहेत.
श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातल्यानंतर शिवसेनेने भारताही बुरखाबंदी व्हावी, अशी मागणी केली होती. नंतर त्यांनी अनेकांच्या विरोधानंतर यावर घूमजाव केले होते. मात्र, ही मागणी काही नेते उचलून धरत आहेत. याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरही अनेक पोस्ट शेअर झाल्या. 'बुरख्याआडून देशभरात दहशतवाद पसरवला जात आहे. यामुळे भारतातील लोकशाहीला धोका उत्पन्न झाला आहे, यातून बोगस मतदान करण्याचाही प्रयत्न झाला आहे. त्यामुळे बुरख्यावर बंदी घालणे आवश्यक आहे,' असे सोम यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही बुरखाबंदीच्या मागणीवर टीका केली होती. चित्रपट पटकथा, लेखक आणि गीतकार-शायर जावेद अख्तर यांनी डोक्यावर पदर घेण्यासही बंदी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांचे नाव घेता सोम यांनी कधी डोक्यावरील पदराआडून दहशतवाद पसरला आहे, असा सवाल केला आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सांप्रदायिकता दिसते, असे सोम यांनी म्हटले आहे. जे लोक दहशतवाद्यांना साथ देत आहेत, त्या 'टुकडे-टुकडे गँग'चा तुम्हा प्रचार करता, असेही त्यांनी म्हटले आहे. याआधी भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनीही शिवसेनेच्या मागणीचे समर्थन केले आहे.