'सीएएला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावं; नाहीतर अरबी समुद्रात जलसमाधी घ्या' - Bjp mla controversial statement
जे नागरिक सीएए कायद्याला विरोध करत आहेत. देशात आगी लावत आहेत, आणि पोलिसांना मारत आहेत, ते देशाचे शत्रू आहेत - भाजप आमदार

भाजप आमदार
जयपूर - राजस्थानमधील भाजप आमदाराने नागरित्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरही भाजप आमदार मदन दिलावर यांनी हल्ला केला आहे.