महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'देश विरोधकांना बिर्याणी नाही, तर बुलेट मिळायला पाहिजे' - सी टी रवी वादग्रस्त वक्तव्य

'आय स्टॅड वीथ अनुराग ठाकूर' असा हॅशटॅग ट्विटरवर करत त्यांनी अनुराग ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे.

सी. टी रवी
सी. टी रवी भाजप आमदार

By

Published : Jan 28, 2020, 11:07 PM IST

बंगळुरू - दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार सभेदरम्यान भाजप मंत्री आणि खासदार अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त घोषणा दिली होती. विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत असतानाच कर्नाटकातील भाजप आमदार आणि पर्यटन मंत्री सी. टी रवी यांनी अनुराग ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे. 'आय स्टॅड वीथ अनुराग ठाकूर' असा हॅशटॅग ट्विटरवर करत त्यांनी अनुराग ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे.

'देश विरोधी व्यक्तींना बिर्याणी नाही, तर बुलेट मिळायला पाहिजे, असे ते म्हणाले. जे लोक अनुराग ठाकूर यांच्या घोषणेविरोधात आवाज उठवत आहेत, तेच लोक अजमल कसाब आणि याकूब मेमन यांच्या शिक्षेला विरोध करत होते. या लोकांचा तुकडे तुकडे गँगला पाठिंबा असून सीएए विरोधात ते खोटी माहिती पसरवत आहेत, असे रवी म्हणाले म्हणाले.सी. टी रवी यांनी याआधीही सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्यां विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते, बहुसंख्य नागरिक जेव्हा संयम गमावतात, तेव्हा काय होत हे पाहायचं असेल तर गोध्रानंतर काय झाल ते आठवा. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरामध्ये चर्चा झाली होती.
अनुराग ठाकूर यांची वादग्रस्त घोषणा
दिल्लीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनुराग ठाकूर यांनी 'देश के गद्दारोंको...अशी घोषणा दिली होती, त्यांच्या या घोषनेनंतर उपस्थितांनी 'गोली मारो *** को' असे नारे दिले होते. त्यांच्या घोषनेनंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच ३० जानेवारीला दुपारी दोनपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details