अहमदाबाद- संपूर्ण देशभरात भारतीय जनता पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. भाजपचे सदस्य होण्यासाठी मोबाईलवर सदस्य नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, अहमदाबादमध्ये चक्क बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापू, बाबा राम रहीम आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची नोदणी झाल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या नावाचे बोगस ओळखपत्र एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याचे उघड झाले आहे.
अहमदाबादमध्ये चक्क आसाराम, बाबा राम रहिम आणि इम्रान खान यांच्या नावाने भाजप सदस्य नोंदणी - ETV gujrat
अहमदाबादमध्ये चक्क बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापू, बाबा राम रहिम आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची नोदणी झाल्याचे उघड झाले आहे
अहमदाबादमध्ये चक्क आसाराम, बाबा राम रहीम आणि इम्रान खान यांच्या नावाने भाजप सदस्य नोंदणी
अहमदाबादचे शहर महामंत्री कमलेश पटेल यांनी या प्रकाराविषयी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गुलाम फरीद नावाच्या व्यक्तीने हे बोगस ओळखपत्र व्हायरल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी साईबर क्राईमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.