नवी दिल्ली - भाजप नेते कैलास विजयवर्गीय पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. कैलास विजयवर्गीय एका प्रशासकीय आधिकाऱ्याला धमकी देतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. ' आमच्यासोबत पदाधिकारी आहेत. नाही तर इंदौर शहराला आग लावली असती' असे ते व्हिडिओमध्ये म्हणत असल्याचे पाहायला मिळत आहे.
..नाही तर इंदौर शहराला आग लावली असती, भाजप नेत्याची अधिकाऱ्याला धमकी - BJP Leader Kailash Vijayvargiya
कैलास विजयवर्गीय यांचा एका प्रशासकीय आधिकाऱ्याला धमकी देतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
![..नाही तर इंदौर शहराला आग लावली असती, भाजप नेत्याची अधिकाऱ्याला धमकी भाजप नेते कैलास विजयवर्गीय](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5585849-69-5585849-1578065791880.jpg)
शहरातील समस्यासंबधी इंदौर शहराचे विभागीय आयुक्त आकाश त्रीपाठी यांची भेट घेण्यासाठी विजयवर्गीय आयुक्तांच्या घराबाहेर थांबले होते. मात्र त्यांनी भेटण्यास नकार दिला. त्यावर तुम्ही जनतेचे नोकर आहात हे विसरु नका. त्यांना आम्हाला भेटायला वेळ नाही. ते इतके मोठे झाले आहेत का? आमच्यासोबत पदाधिकारी आहेत. नाही तर इंदौर शहराला आग लावली असती, असे विजयवर्गीय म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
कैलास विजयवर्गीय हे भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्याचा मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण केली होती. या घटनेनंतर आकाश विजयवर्गीय यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर भोपाळच्या विशेष कोर्टाने आकाश विजयवर्गीय यांचा जामीन मंजूर केल्यावर त्यांची सुटका झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत आमदार आकाश विजयवर्गीय यांनी केलेल्या मारहाणीसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. कोणाचाही मुलगा असो, शिस्तभंग चालणार नाही, असे मोदींनी आकाश यांचे नाव न घेता म्हटले होते.