महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लडाख विकास परिषदेच्या चेअरमन पदी ताशी ग्यालसन यांची निवड

भाजपचे नेते ताशी ग्यालसन यांची 'लडाख ऑटोनॉमस हील डेव्हलपमेंट कौन्सिल'च्या (एलएएचडीसी) चेअरमन पदी निवड झाली आहे.

By

Published : Oct 31, 2020, 10:54 PM IST

Updated : Nov 1, 2020, 3:30 PM IST

Lahdc elections
भाजप नेते ग्यालसन

श्रीनगर- भाजपचे नेते ताशी ग्यालसन यांची 'लडाख ऑटोनॉमस हील डेव्हलपमेंट कौन्सिल'च्या (एलएएचडीसी) चेअरमन पदी निवड झाली आहे. ग्यालसन हे बिनविरोध या पदावर निवडून आले आहेत.

भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल मी नागरिकांचा आभारी आहे. येत्या काळात तुम्हाला लडाखचा चांगला विकास झालेला पाहायला मिळेल, असे आश्वासन ग्यालसन यांनी दिले. तसेच, लवकरच कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. त्यानंतर पुढील वाटचाल काय असेल, याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ग्यालसन यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर दिली.

लडाख आता जिल्हा राहिलेला नाही, तो आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. त्यामुळे, नवी आव्हाने उभी राहीली आहेत. आपल्याला नव्या परिषदेची बांधणी करायची आहे, आणि ती केंद्रशासित लडाखची पहिली परिषद असणार. सर्व नगरसेवक मेहनतीने काम करतील, अशी आशा ग्यालसन यांनी व्यक्त केली.

हेही वाचा-बिहार निवडणुकीतील प्रचार कसा बदलतोय; पाकिस्तान, पुलवामा घटनांच्या चर्चेचे कारण काय?

Last Updated : Nov 1, 2020, 3:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details