महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धक्कादायक..! दिल्लीत कोरोनामुळे भाजप नेत्याचा मृत्यू - भाजप नेते संजय शर्मा

दिल्लीतील भाजप पक्षाचे नेते संजय शर्मा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

BJP leader dies due to corona
भाजप नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

By

Published : Jun 11, 2020, 7:33 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे गुरुवारी भाजप नेते संजय शर्मा यांचे निधन झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शर्मा दिल्लीत पार्टी कमिटीचे अध्यक्ष होते.

लॉकडाऊनवेळी शहरातील गरजूंना दिलासा देण्यासाठी शर्मा यांनी सामाजिक कार्यात भाग घेतला होता. यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाली आणि गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दिल्ली भाजपचे सरचिटणीस राजेश भाटिया यांनी संजय शर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की, लॉकडाऊनदरम्यान अत्यंत सक्रिय असलेले भाजप दिल्लीचे समिती अध्यक्ष संजय शर्मा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,आणि कुटुंबाला ही वेदना सहन करण्याची शक्ती मिळावी, यासाठी प्रार्थना, असे भाटिया यांनी ट्विट केले आहे.

दिल्ली भाजप नेते नीलकांत बक्षी यांनीही संजय शर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details