कोलकाता- तृणमूल काँग्रेसचे किमान पाच खासदार भाजपमध्ये दाखल होण्यास तयार आहेत. ते कोणत्याही वेळी राजीनामा देऊ शकतात, असा दावा पश्चिम बंगालमधील बॅरेकपूरचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले अर्जुन सिंह यांनी शनिवारी केला आहे.
सौगता राय यांचादेखील या यादीमध्ये समावेश
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा सदस्य सौगता राय यांचादेखील या यादीमध्ये समावेश आहे. त्यांच्यासह किमान पाच खासदार भाजपमध्ये जाण्यास तयार आहेत आणि ते कधीही पक्षात सामील होऊ शकतात, असेही अर्जुन सिंह म्हणाले.
राय यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, "ते 'तृतीय श्रेणी'चे राजकारणी आणि बाहुबली नेता आहेत. मी माझ्या पक्षाबरोबर आहे आणि मी कधीही भाजपामध्ये सामील होणार नाही. अशा अफवा पसरवणे हे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे काम आहे. त्यांनी अशा बनावट बातम्यांचा प्रसार केला. मी भाजपमध्ये जाण्यापेक्षा राजकारण सोडून मरणे पसंत करतो. मला त्यांची राजकीय विचारधारा आवडत नाही.