नवी दिल्ली - भाजप नेते अनिल सौमित्र यांचे पक्षाकडून अखेर निलंबन करण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेत्याचे निलंबन - mahatma gandhi
या प्रकरणावर पक्षाने ७ दिवसांमध्ये यावर उत्तर मागितले आहे.
भाजप नेते अनिल सौमित्र
महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता असल्याचे वक्तव्य मध्य प्रदेशचे भाजप नेते अनिल सौमित्र यांनी केले होते. या वक्तव्याची पक्षाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. पक्षाने त्यांना निलंबित केले असून ७ दिवसांमध्ये यावर उत्तर मागितले आहे.
Last Updated : May 17, 2019, 3:53 PM IST