बर्धमान -भाजपचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्याला दहशतवादाचे मुख्य केंद्र बनवल्याचा आरोप केला. ते बर्धमान टाऊन हॉल मैदानावर आयोजित एका सभेदरम्यान पत्रकारांशी बोलत होते.
सिन्हा म्हणाले, ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगाल राज्याचे दहशतवादी राज्यात रुपांतर झाले आहे. यामुळेच २०१९ मध्ये झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीत भाजपने १८ जागांवर विजय मिळवला होता. हा विजय म्हणजे ममतांच्या तोंडावर एक प्रकारची चपराक होती. तर, २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथील जनता आम्हाला निवडून देतील.
या राज्यात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात निदर्शनांदरम्यान कितीतरी पक्षाचे कार्यकर्ते तुरुंगात तर, कुणी रुग्णालयात आहेत, याची कुणाला काळजी आहे का? पोलिसांसमोर कार्यक्रम होण्यापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांवरही हल्ला करण्यात आला होता, असे सिन्हा म्हणाले.