चंदीगड- दिल्लीतील भाजप मुख्यालयामध्ये आज(मंगळवार) महत्वपूर्ण बैठक होणार आहे. हरियाणा, महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक होणार आहे. काल(सोमवारी) दोन्ही राज्यांमध्ये मतदान पार पडल्यानंतर पुढील डावपेच ठरवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -हरियाणा विधानसभा निवडणूक: राज्यात 5:30 वाजेपर्यंत 61.29 टक्के मतदान
हरियाणामध्ये ६८.३० टक्के मतदान
हरियाणा विधानसभेसाठी ६८.३० टक्के मतदान झाले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ७६.१३ टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या तुलनेत आताच्यावेळी मतदान कमी झाले. फतेहबाद जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वात जास्त मतदान झाले. या जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रामध्ये ७६.०९ टक्के मतदान झाले. राज्यातील सर्व मतदानाच्या टक्केवारीपेक्षा फतेहबादमधील टक्केवारी जास्त आहे.