नवी दिल्ली - जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मंगळवारी २०२४ पर्यंत प्रत्येक घरी पिण्याच्या स्वच्छ पाणी पुरवठा होईल असे आश्वासन दिले आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची उपलब्ध होणे हा भारतासह संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार यासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
२०२४ पर्यंत प्रत्येक घरी पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा - जलशक्ती मंत्री शेखावत - gajendra singh shekhwat
'आपल्याकडे १९५० मध्ये उपलब्ध असलेल्या दरडोई पाण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. हे प्रमाण सध्या आधीच्या तुलनेत केवळ एक तृतीयांश राहिले आहे. त्या वेळी दरडोई ५ हजार लिटर पाणी उपलब्ध होते. आता ते दरडोई १४०० लिटरवर आले आहे,' असे शेखावत म्हणाले.
'आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आणि पशुधन आहे. त्या तुलनेत दरडोई पाण्याची उपलब्धता कमी आहे. आपल्याकडे १९५० मध्ये उपलब्ध असलेल्या दरडोई पाण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. हे प्रमाण सध्या आधीच्या तुलनेत केवळ एक तृतीयांश राहिले आहे. तर, लोकसंख्या मात्र तिप्पट वाढली आहे. त्या वेळी दरडोई ५ हजार लिटर पाणी उपलब्ध होते. आता ते दरडोई १४०० लिटरवर आले आहे,' असे शेखावत म्हणाले.
'भाजपने निवडणुकीवेळी आश्वासन दिल्यानुसार प्रत्येक घरी पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवण्यात येईल,' असे शेखावत म्हणाले. मोदी सरकार दुसऱ्यांना सत्तेत आल्यानंतर नुकतीच जलशक्ती मंत्रालयाची स्थापना झाली आहे. जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाचे पुनर्गठन करून याची निर्मिती केली आहे. याचा पदाभार आधी नितीन गडकरी यांच्याकडे होता. पिण्याचे पाणी आणि स्वच्छता मंत्रालयाचाही यात समावेश करण्यात आला आहे.
मागील महिन्यात तमीळनाडूत निवडणूक रॅलीदरम्यान नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, शेतकऱ्यांना जलसिंचन योजनेचे आश्वासन देण्यात आले होते. भारतातील बहुतांश ग्रामीण भाग शेती आणि घरगुती वापरातील पाण्यासाठी पावसावरच अवलंबून आहे. त्यांची वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी युद्धपातळीवर पाणी व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातही पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.