मथुरा(उत्तर प्रदेश)- मथुरा महानगरपालिकेच्या बैठकीत भाजपच्या नगरसेविकेने पालिका आयुक्तांवर चप्पल फेकली आणि स्टेनोग्राफरला मारहाण केली. या प्रकरणी नगरसेविका आणि तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या बैठकीत हा प्रकार घडला.
मथुरा महापालिकेच्या आयुक्तांवर भाजप नगरसेविकेने फेकली चप्पल; स्टेनोग्राफरला मारहाण - दीपिका राणी सिंग
महापालिका आयुक्त रवींद्र कुमार मंडेर आणि वार्ड क्रमांक 24 च्या नगरसेविका दीपिका राणी यांच्यामध्ये बैठकीत विकासकामांवरुन वाद झाला. यानंतर भाजपच्या नगरसेविका असलेल्या दीपिका राणी यांनी आयुक्तांवर चप्पल फेकली आणि स्टेनोग्राफरला मारहाण केली. याप्रकरणी नगरसेविका आणि तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
महापालिका आयुक्त रवींद्र कुमार मंडेर आणि वार्ड क्रमांक 24 च्या नगरसेविका दीपिका राणी यांच्यामध्ये बैठकीत विकासकामांवरुन वाद झाला. यानंतर भाजपच्या नगरसेविका असलेल्या दीपिका राणी यांनी आयुक्तांवर चप्पल फेकली. त्यानंतर त्या आयुक्तांकडे जात असताना स्टेनोग्राफर होशियार सिंग याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेविका आणि तिचे पती पुष्पेंद्र सिंग यांनी त्याला चप्पलने मारहाण केली, अशी माहिती महापालिका उपायुक्त राज कुमार मित्तल यांनी दिली.
हा प्रकार घडल्यानंतर महापालिकेची बैठक रद्द करण्यात आली. यानंतर सर्व सदस्य बैठकीतून निघून गेले. आयुक्त मंडेर यांनी या प्रकरणात दीपिका राणी दोषी असून राज्य सरकारला त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबद्दल कळवणार असल्याचे सांगितले.