महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसची ७२ हजाराची घोषणा फक्त धोका; मोदी सरकार १ लाख ६ हजार रुपये देत आहे - भाजप - Lok sabha 2019

राहुल गांधी यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसने ७२ हजार रुपये गरीबांना देण्याची केलेली घोषणा फोल आहे, असे जेटली म्हणाले. मोदी सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना दरवर्षी जवळपास १ लाख ६ हजार रुपये देत आहे, असेही जेटली यावेळी म्हणाले.

अर्थमंत्री जेटली बोलताना

By

Published : Mar 26, 2019, 9:33 AM IST

Updated : Mar 26, 2019, 9:52 AM IST

नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेसने किमान मूलभूत उत्पन्न हमी योजनेची घोषणा केली. या योजने अंतर्गत देशातील २० टक्के गरीबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याची हमी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. मात्र, काँग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणेवर भाजपने टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसने ७२ हजार रुपये गरीबांना देण्याची केलेली घोषणा फोल आहे, असे जेटली म्हणाले. मोदी सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना दरवर्षी जवळपास १ लाख ६ हजार रुपये देत आहे, असेही जेटली यावेळी म्हणाले.


निवडणूक जिंकण्यासाठी गरिबांना भ्रमात ठेऊन काँग्रेस मोठ-मोठ्या घोषणा करते, असा काँग्रेसचा इतिहास आहे. काँग्रेसने केलेली ही घोषणाही धोका आहे. काँग्रेसच्या काळात गरीबी तशीच राहीली, असेही जेटली यांनी यावेळी स्पष्ट केले. नारे आणि मोठ्या घोषणांनी देशातील गरीबी संपणार नाही. मोदी सरकारने गरीबांना आवास, गॅस कनेक्शन आणि शौचालय दिले आहे, असेही जेटली यावेळी म्हणाले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेळी देशाचा विकास दर केवळ ३.५ टक्के होता. या विकास दराने गरीबी संपणे शक्य नाही. या नंतर इंदिरा गांधी आल्या. त्यांनी गरीबी हटाओचा नारा दिला. मात्र, गरीबी संपवण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. राजीव गांधी सरकारमध्येही तशेच झाले. या प्रकारे मागच्या १० वर्षातही जनतेचा छळ झाला, असेही जेटली यावेळी म्हणाले.

Last Updated : Mar 26, 2019, 9:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details