रतलाम - भारत स्वतंत्र होत असताना जर पंडित नेहरु यांच्या ऐवजी मोहम्मद जिना यांना पंतप्रधान बनवले असते तर भारताचे दोन तुकडे झाले नसते, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवाराने केले आहे. गुमानसिंग दामोर असे या उमेदवारांचे नाव असून ते रतलाम-झाबुआ या मतदारसंघात निवडणुकीस उभे आहेत.
जिनांसारखा विद्वान भारताचा पंतप्रधान बनला असता तर.., भाजप उमेदवाराकडून जिनांवर स्तुतीसुमने - candidate
या देशाचे तुकडे होण्यास कुणी जबाबदार असेल तर ते काँग्रेस आहे, असेही गुमानसिंग दामोर म्हणाले.

गुमानसिंग दामोर
गुमानसिंग दामोर
मोहम्मद जिना हे वकिल, एक विद्वान व्यक्ती होते. जवाहरलाल नेहरु यांनी पंतप्रधान होण्याचा हट्ट केला नसता तर जिना हे देशाचे पंतप्रधान झाले असते. या देशाचे तुकडे होण्यास कुणी जबाबदार असेल तर ते काँग्रेस आहे, असेही गुमानसिंग दामोर म्हणाले.
Last Updated : May 11, 2019, 10:26 PM IST