शिलाँग - एकीकडे मोदी सरकार नागरिकता संशोधन विधेयक (सिटिजनशिप अमेंडमेंट बिल) आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. दूसरीकडे त्यांच्याच पक्षातील उमेदवार या विरोधात आवाज उठवत आहेत. मेघालयातील शिलाँगचे भाजपचे उमेदवार सनबोर शुल्लई यांनी मी जिवंत असेपर्यंत नागरिकता संशोधन विधेयक आणले जाणार नाही, असे वक्तव्य केले आहे.
..तर मी मोदींसमोर आत्महत्या करेन; भाजप उमेदवाराचे मोदींनाच आव्हान - candidate
शुल्लई म्हणाले, या विधेयकाला माझा विरोध आहे, जर हे विधेयक आणण्याचा कोणी प्रयत्न करेल तर मी नरेंद्र मोदी यांच्या समोर आत्महत्या करेन, पण हे विधेयक आणू देणार नाही.
शिलाँगचे भाजपचे उमेदवार सनबोर शुल्लई
शुल्लई म्हणाले, या विधेयकाला माझा विरोध आहे, जर हे विधेयक आणण्याचा कोणी प्रयत्न करेल तर मी नरेंद्र मोदी यांच्या समोर आत्महत्या करेन, पण हे विधेयक आणू देणार नाही.
ईशान्य भारतात सिटिजनशिप अमेंडमेंट बिल आणण्याचा सरकारचा विचार आहे. काही दिवसापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात मोदी यांनी विरोधकांवर सिटिजनशिप अमेंडमेंट बिलविषयी चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप केला होता.
Last Updated : Apr 12, 2019, 10:37 AM IST