नवी दिल्ली - भाजपने ज्योतिरादित्य सिंधिया यांना मध्यप्रदेशमधून तर महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना राज्यसभेवर उमेदवारी जाहीर केली आहे.
उदयनराजे पुन्हा होणार खासदार.. आजच भाजप प्रवेश केलेल्या सिंधियांनाही राज्यसभेची उमेदवारी जाहीर
भाजपने ज्योतिरादित्य सिंधिया यांची मध्यप्रदेशमधून तर महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना राज्यसभेवर उमेदवारी जाहीर केली आहे.
राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारांच्या निवडीसंदर्भात भाजपकडून अखेर निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन उदयनराजे भाजपमध्ये गेले होते. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. त्यामुळे उदयनराजे यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपने पुन्हा राज्यसभेवर पाठवले आहे.
तसेच आजच काँग्रेसच्या गोटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनादेखील भाजपने मध्यप्रदेशमधून राज्यसभेवर पाठवले आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासाठी दोघांनाही ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. ज्योतिरादित्य यांच्यासह हर्ष सिंह चौहान यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.