भाजपची लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; ४६ उमेदवारांचा समावेश - Fifth List
आतापर्यंत आम्ही ५ याद्या जाहीर केली असून २८६ उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे, अशी माहिती जे. पी. नड्डा यांनी दिली.
जे. पी. नड्डा
नवी दिल्ली - भाजपने लोकसभा निवडणुकीसाठीची पाचवी यादी जाहीर केली आहे. महासचिव जे.पी.नड्डा यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या यादीत ४६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये झारखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमधील उमेदवारांचा समावेश आहे.
आतापर्यंत आम्ही ५ याद्या जाहीर केली असून २८६ उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे, अशी माहिती जे. पी. नड्डा यांनी दिली.