महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपचे सगळे चौकीदार चोर - राहुल गांधी - Chor

नमो, अरुण जेटली आणि राजनाथ सिंह अशी नावे लिहित त्यापुढे रिकाम्या ओळी लिहून सगळेच चौकीदार चोर आहेत, असे राहुल यांनी टि्वट करत म्हटले आहे.

राहुल गांधी

By

Published : Mar 22, 2019, 11:15 PM IST

नवी दिल्ली - भाजपचे सगळे चौकीदार चोर आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. राहुल यांनी टि्वट करत अशी टीका केली आहे. नमो, अरुण जेटली आणि राजनाथ सिंह अशी नावे लिहित त्यापुढे रिकाम्या ओळी लिहून सगळेच चौकीदार चोर आहेत, असे राहुल यांनी टि्वट करत म्हटले आहे.

येदियुरप्पांनी १८०० कोटी रुपये भाजपच्या केंद्रीय समितीला वाटले, असा आरोप काँग्रेसने केला. या संदर्भातील एक बातमी टि्वट करत राहुल यांनी भाजपचे सगळे चौकीदार चोर आहेत, असे टि्वट केले आहे. एका संकेतस्थळाचा संदर्भ देत राहुल यांनी टि्वट केले आहे.

नुकतेच भाजपच्या अनेक नेत्यांनी टि्वटरवर आपल्या नावासमोर चौकीदार असे लिहिले होते. राहुल यांनी मोदींवर टीका करताना 'चौकीदार ही चोर है' अशी मोहिम चालवली होती. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने 'मैं भी चौकीदार' अशी मोहिम सुरू केली.

ABOUT THE AUTHOR

...view details