वॉशिंग्टन डीसी - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून पुरवल्या जाणारा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला. यावरून मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
'जागतिक आरोग्य संकटाच्या वेळी जागतिक आरोग्य संघटनेला दिलेला निधी थांबवणे धोकादायक आहे. संघटना कोरोनाचा प्रसार कमी करत आहे. जर हे काम थांबले तर त्यांची जागा कोणतीही इतर संस्था घेऊ शकत नाही. या संस्थेची पूर्वी कधीच नव्हती तेवढी गरज आज आहे', असे बिल गेट्स यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.