विलासपूर - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना महामारीविरोधात पोलीस, आरोग्य कर्मचारी लढा देत आहे. या व्यतिरिक्त पोलीस विभागाने लोकसेवेसाठी स्तुत्य पुढाकार घेतला आहे. शहरातील पोलीस समितीने मास्क तयार केले असून त्यांचे वाटप करण्यात येत आहेत. याद्वारे पोलीस जनजागृती पसरवत आहेत.
समाजभान! पोलीस विभागाकडून 5 हजारांपेक्षा अधिक मास्क तयार - पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल
विलासपूर पोलीस समितीने मास्क तयार केले असून त्यांचे वाटप करण्यात येत आहेत. याद्वारे पोलीस जनजागृती पसरवत आहेत.
पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी मास्क तयार करण्यासाठी खाकी कपड्याचा वापर करण्याचे निर्देश पोलीस कल्याण समितीला दिले होते. त्यानंतर काही दिवसांत 5 हजाराहून अधिक मास्क तयार झाले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बाजारात देखील मास्कचा तुटवडा आहे. अशामध्ये काही ठिकाणी मास्क दुप्पट किमतीला विकले जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत मास्कची कमतरता लक्षात घेता पोलिस विभागाकडून शिलाई मिशनवर मास्क करण्यात येत आहेत. पोलिस विभागाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.