नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए) सरकार विजयी झाले आहे. मात्र, मोदींनी हा विजय कोरोना महामारीचे यशस्वी व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केल्यावरून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते सिताराम येचुरी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. एनडीएला महागठबंधनपेक्षा फक्त ०.०३ टक्के मते जास्त मिळाली असल्याते ते म्हणाले.
एनडीएला फक्त ०.०३ टक्के मते जास्त
नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत सीपीआय, सीपीआयएम आणि सीपीआय (एमएल) पक्षाला २९ जागांपैकी १६ जागावर विजय मिळवता आला. 'पंतप्रधान मोदींनी अविचारीपणातून बिहार निवडणुकीतील विजयाची श्रेय कोरोनाचे आणि अर्थव्यवस्थेच्या यशस्वी व्यवस्थापनास दिले आहे. मात्र, मतांचा विचार करता, एनडीएला महागठबंधनपेक्षा फक्त ०.०३ टक्के जास्त मते मिळाल्याचे येचुरी म्हणाले. त्यामुळे भाजपाचा हा विजय कोरोना व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्थेच्या यशाचा अजिबात नाही, असे येचुरी म्हणाले.