महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रीय जनता दलाचे तीन आमदार आज जनता दल युनायटेडमध्ये करणार प्रवेश - जनता दल युनायटेडचे नेते नितीशकुमार

या तीन आमदारांनी जनता दल युनायटेडचे नेते नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे म्हटले आहे. गाजीघटचे आमदार महेश्वर प्रसाद यादव, पातेपूरचे आमदार प्रेमा चौधरी आणि केवटीचे आमदार फराज फातमी यांचा समावेश आहे.

Three expelled RJD MLAs set to join JD-U today
Three expelled RJD MLAs set to join JD-U today

By

Published : Aug 17, 2020, 2:41 PM IST

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाने हकालपट्टी केलेल्या तीन आमदार आज सोमवारी जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या तीन आमदारांनी जनता दल युनायटेडचे नेते नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे म्हटले आहे. गाजीघटचे आमदार महेश्वर प्रसाद यादव, पातेपूरचे आमदार प्रेमा चौधरी आणि केवटीचे आमदार फराज फातमी यांचा समावेश आहे.

श्याम रजक यांची राष्ट्रीय जनता दलात घरवापसी

11 वर्षानंतर पुन्हा श्याम रजक यांची राष्ट्रीय जनता दलात घरवापसी झाली आहे. आज राबडी देवी यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या 10 सर्कुलर रोडवर त्यांना राष्ट्रीय जनता दलात प्रवेश देण्यात आला. विरोधी पक्ष नेता तेजस्वी यादव यांनी त्यांचे स्वागत केले.

ABOUT THE AUTHOR

...view details