लखीसराय - जिल्ह्यातील हलसी ठाणे पोलीस ठाणे परिक्षेत्रात एका ट्रकने अनेकांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात ८ जण ठार झाले. तर, ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भरधाव ट्रकने ११ किलोवॅट विजेच्या खांबासह आणखी २ खांबांनाही धडक दिल्याने हे विद्युत प्रवाहित खांबही कोसळले आहेत.
बिहारमध्ये ट्रकच्या धडकेत ८ ठार, ५ गंभीर जखमी - बिहार न्यूज
घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रचंड गोंधळ आणि आक्रोश सुरू झाला. ग्रामस्थांनी लखीसराय सिकंदरा मार्ग अडवून धरला. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी लोकांना समजावत रस्ता मोकळा केला.
घटनास्थळी दुखी मांझी येथे लग्न समारंभ सुरू होता. येथे अनेक वऱ्हाडी आणि इतर काही लोक उपस्थित होते. भरधाव वेगाने सुटलेला ट्रक या सर्वांना चिरडत पुढे निघून गेला. यात ७ जण जागीच ठार झाले. एका व्यक्तीने रुग्णालयात उपाचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रचंड गोंधळ आणि आक्रोश सुरू झाला. ग्रामस्थांनी लखीसराय सिकंदरा मार्ग अडवून धरला. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी लोकांना समजावत रस्ता मोकळा केला.