पाटणा - राबडीदेवी यांनी शनिवारी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 'नितीश कुमार म्हणाले की, त्यांना महाआघाडीने आताच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावे. त्या बदल्यात २०२० मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करू, असे ते म्हणाले,' असा दावा राबडी देवी यांनी केला आहे.
'रालोआकडून नितीश यांना योग्य संधी मिळत नाही. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडूनही. ते भाजपच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे ते आरजेडीशी पुन्हा आघाडी करू इच्छितात. प्रशांत किशोर त्यांच्या या म्हणण्याविषयी विचारणा करण्यासाठी किमान ५ वेळा येऊन गेले. नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना २०२० मध्ये मुख्यमंत्री बनवू असे सांगितले. त्याबदल्यात त्यांना महाआघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावे, अशी मागणी केली आहे,' असे माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी सांगितले.