बंगळुरु - कर्नाटकमधील बंगळुरु येथे एका दाम्पत्यांने आत्महत्या केली आहे. हे दाम्पत्य काही दिवासांपूर्वी बिहार येथून बंगळुरुमध्ये राहण्यास आले होते. शुक्रवारी सांयकाळी ही घटना समोर आली असून याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
कर्नाटक : बंगळुरुमध्ये बिहारी दाम्पत्याची आत्महत्या - Bihar origin couple commits suicide in Bangalore
कर्नाटकमधील बंगळुरु येथे एका दाम्पत्यांने आत्महत्या केली आहे. हे दाम्पत्य काही दिवासांपूर्वी बिहार येथून बंगळुरुमध्ये राहण्यास आले होते.
पती राहुल (वय 30) आणि पत्नी राणी (वय 26) यांनी बंगळुरुमधील यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. हे दाम्पत्य मुळेचे बिहारचे होते. मात्र, सध्या ते बंगळुरुमध्ये वास्तव्यास होते. शहरातील श्रीरामपुरा विभागातील दयानंद रोड येथे हे दाम्पत्य भाड्याने राहत होते.
शुक्रवारी सांयकाळी वीज बिल देण्यासाठी घर मालकाने त्यांचे दार ठोठवले. तेव्हा ही घटना समोर आली. राणीचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेला तर राहुलने विष प्राशन केलेले आढळले. त्यावर घर मालकाने तातडीने श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे.