गया (बिहार) -भाजपा नेते आणि कृषीमंत्री प्रेम कुमार यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रेम कुमार बुधवारी मतदान केंद्रात पक्षाचे प्रतिक असणाऱ्या कमळाचा मास्क आणि मफलर परिधान करुन मतदान करण्यासाठी आले. मतदान करताना देखील मास्क उतरवला नाही. त्यामुळे याप्रकरणावरुन वाद निर्माण झाला. यानंतर निवडणूक आयोगाने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची मागणी केली. मात्र प्रेम कुमार यांनी हे कृत्य नकळत झाले आणि यामागे कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण दिले.
गया येथे मंत्री प्रेम कुमार यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल - प्रेम कुमार बातमी
भाजपा नेते आणि कृषीमंत्री प्रेम कुमार यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रेम कुमार बुधवारी मतदान केंद्रात पक्षाचे प्रतिक असणाऱ्या कमळाचा मास्क आणि मफलर परिधान करुन मतदान करण्यासाठी आले. मतदान करताना देखील मास्क उतरवला नाही. त्यामुळे याप्रकरणावरुन वाद निर्माण झाला. यानंतर निवडणूक आयोगासह जिल्ह्याधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
![गया येथे मंत्री प्रेम कुमार यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल Model Code of Conduct](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9342256-223-9342256-1603884219804.jpg)
कुमार हे गया येथील भाजपाचे उमेदवार आहेत. ते आतापर्यंत सहा वेळा याठिकाणी निवडून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने प्रेम कुमार यांच्या कृत्याची दखल घेतली असून, त्यांनी आचार संहिता उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाचे आदेश देण्यात आले आहेत. कडेकोट सुरक्षा आणि कोविडच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बुधवारी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. आज मतदान असलेल्या मतदारसंघांपैकी सर्वाधिक ४२ ठिकाणी आरजेडी रिंगणात आहे. त्याखालोखाल ३५ ठिकाणी जेडीयू, २९ ठिकाणी भाजप तर २० जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत.