नवी दिल्ली - सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूने आता भारतातही आपले जाळे झपाट्याने विस्तारले आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद पडल्याने अनेक मजूर, कामगार मिळेल त्या साधनाद्वारे किंवा पायपीट करत आपल्या घराकडे परतत आहेत. गुजरातमधून श्रमिक रेल्वेने बिहारमधील आपल्या घरी निघालेल्या महिलेले रेल्वेमध्ये बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे.
स्थलांतरीत गर्भवती कामगार महिलेने श्रमिक रेल्वेमध्ये दिला बाळाला जन्म - रेल्वेमध्ये बाळाला जन्म
गुजरातमधून श्रमिक रेल्वेने बिहारमधील आपल्या घरी निघालेल्या महिलेले रेल्वेमध्ये बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे.
स्थलांतरीत कामगार गर्भवती महिला श्रमिक रेल्वेने गुजरातमधून बिहारला निघाली होती. मात्र, रेल्वेमध्ये तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या. यावेळी रेल्वेतील इतर महिला प्रवाशांच्या मदतीने तिची प्रसुती करण्यात आली. महिलने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून प्रसूतीनंतर बाळ व आईची प्रकृती उत्तम आहे.
लॉकडाऊनमुळे गर्भवती महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक स्थलांतरीत गर्भवती महिलांनी पायी चालत आपले घर गाठले आहे. तर काही महिलांची बस, रेल्वेमध्ये नाही, तर रस्त्यांवर प्रसुती झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.