तुम्ही सीटबेल्ट लावलाय का? नागरिकांनी जाब विचारल्याने पोलिसांची घाबरगुंडी - not wearing seat belts driving
पोलिसांनी वाहन चालवताना सीट बेल्ट लावले नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे जमलेल्या लोकांनी त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. आक्रमक झालेल्या लोकांनी शिवीगाळ करत गाडीत शिरण्याचा प्रयत्न केला.
![तुम्ही सीटबेल्ट लावलाय का? नागरिकांनी जाब विचारल्याने पोलिसांची घाबरगुंडी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4437347-776-4437347-1568449353287.jpg)
मुझफ्फरपूर
मुझफ्फरपूर - सुधारित मोटार वाहन कायद्याच्या विरोधात नागरिकांचा रोष आहे. या कायद्यातील अव्वाच्या-सव्वा दंडाच्या तरतुदीमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये नागरिकांनी पोलिसांनाच नियम दाखवल्याचे दिसून आले. आक्रमक झालेल्या लोकांमुळे पोलिसांना गाडीचे दार बंद करून बसावे लागले.