महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या, मारेकऱ्यांनी ठार करण्याआधी डोळे फोडले - blind

नालंदाचे पोलीस अधीक्षक निलेश कुमार यांनी याविषयी माहिती दिली. 'त्याच्या डोळ्यांतून रक्त वाहत होते. याशिवाय शरीरावर कोणतीही दृश्य जखम किंवा माराचे व्रण नव्हते. मृत्यूचे कारण मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर समोर येईल. तपासकार्य सुरू आहे,' असे ते म्हणाले.

बिहारमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या

By

Published : Apr 15, 2019, 9:49 AM IST

नालंदा - बिहारमधील हिंदुस्थान वृत्तपत्राचे पत्रकार आशुतोष कुमार आर्य यांच्या मुलाची रविवारी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी त्याला ठार करण्याआधी त्याचे डोळे फोडून त्याला अंध बनविले होते. हत्येनंतर त्याचा मृतदेह तेथील तलावात फेकण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हरनौत पोलीस ठाणे परिक्षेत्रात हसनपूर गावात ही घटना घडली. चुन्नू कुमार असे मृताचे नाव आहे.

बिहारमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या


नालंदाचे पोलीस अधीक्षक निलेश कुमार यांनी याविषयी माहिती दिली. 'त्याच्या डोळ्यांतून रक्त वाहत होते. याशिवाय शरीरावर कोणतीही दृश्य जखम किंवा माराचे व्रण नव्हते. मृत्यूचे कारण मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर समोर येईल. तपासकार्य सुरू आहे,' असे ते म्हणाले. अद्याप हत्येचे कारण समजलेले नाही. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली.


आशुतोष कुमार यांच्या मुलीचे एका महिन्यानंतर लग्न ठरले होते. त्याआधीच त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो संध्याकाळी घरातून बाहेर पडला होता. तो परत न आल्याने घरच्यांकडून शोधाशोध सुरू झाली. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. ग्रामस्थांकडून त्याचा मृतदेह तलावात असल्याची माहिती मिळाली.

ABOUT THE AUTHOR

...view details