पुणे - कोंढवा भिंत दुर्घटनेतील मजूरांच्या कुंटुबीयांना बिहार सरकारने प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इमारतीची संरक्षक भिंत पत्र्याच्या खोल्यांवर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या अपघातात भिंतीच्या मलब्याखाली दबून १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे.
पुणे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबीयांना बिहार सरकारकडून प्रत्येकी २ लाखांची मदत - laborers
कोंढवा भिंत दुर्घटनेतील मजूरांच्या कुंटुबीयांना प्रत्येकी 2 लाखांची मदत बिहार सरकारने जाहीर केली आहे.
कोंढव्यातील सोमाजी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. हे मजूर बिहार राज्यातील आहेत. बचावकार्य पूर्ण झाले असून मृतदेह त्यांच्या मूळ गावाकडे रवाना करण्यात आले आहेत. या घटनेतील मृताच्या कुटुंबीयांना बिहार सरकारकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
कोंढव्यात कांचन कम्फर्ट इमारतीच्या विकासकाने मजुरांसाठी पत्र्याच्या खोल्या बांधल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर या खोल्यांवर शेजारच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असून कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा मलबा पडला आहे. यावेळी मजूर झोपेत असल्याने भिंतीच्या मलब्याखाली दबले.